लहान
पणी जेव्हा केव्हा मामाच्या गावी जात असे तेव्हा नेहमी आपला गाव आणि
मामाचा गाव यामध्ये सारखं अन वेगळं काय हे शोधायचो. पण जास्त फरक नव्हताच
कारण दोन्ही गावे तशी खेडीच.फरक असायचा तो मामाचा गाव म्हणजे भीमा काठ
उसाचा अथांग पसरलेला हिरवळ शिवार आणि आमचा गाव म्हणजे सीना काठ, खरीप,
रब्बी चा आमचा अथांग सहामाही हिरवा शिवार त्यामध्ये कुठेतरी (२-३) एकराचा
उसाचा तुकडा (जो फक्त खरीप अन रब्बी हंगामात हिरवा अन उन्ह्याळ्यात
पाण्यावाचून जळालेला असायचा). सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके,त्यापैकी
माळशिरस, उत्तर सोलापूर (एकही नदी नाही), करमाळा अन माढा तालुक्याला (सीना
,भीमा), पंढरपूर अन मंगळवेढा ला (माण ,भीमा), दक्षिण सोलापूर (भीमा)
बार्शी (भोगावती), मोहोळ (सीना ,भीमा ) क्कलकोट (कुरनूर नदी पण खूप छोटी ) अश्या प्रकारे
नद्यांचा लाभ होतो. भीमाकाठ अन सिनाकाठ हा भाग सोडून आणखी दोन नद्या आमच्या
जिल्ह्यात त्या म्हणजे माण ( जी दुष्काळी माण देशातून सांगोला,मंगळवेढा न
पंढरपूर तालुक्यात भीमेला मामाच्या गावी मिळते) अन दुसरी भोगावती ( जी
मराठवाड्यातून बार्शी अन शेवटी मोहोळ तालुक्यात येऊन आमच्या गावी सीना
नदीला मिळते). हा भूगोल एवढ्यासाठीच सांगतोय कारण प्रगतीची खरी गुपित
आपल्या भूगोलातच कशी दडलीत ती फक्त या ब्लॉग च्या माध्यमातून एक उदाहरण
म्हणून सांगायचा एक प्रयत्न करतोय.
भीमा नदीवर यशवंतराव चव्हाणांनी साधारण ३० वर्षांपूर्वी उजनी धरण बांधले. त्यामुळे दुष्काळी सोलापूरचे चित्र बदलले आणि किमान भीमाकाठ आणि अक्कलकोट, बार्शी वगळता इतर सर्व तालुके (खरीप आणि रब्बी हंगाम चांगल्या पद्धतीने घेऊ लागले). भीमाकाठ मात्र साखर कारखानदारीत चांगलाच नटू लागला.सीना, माण अन भोगावती नद्या मात्र सहामाहीच जिवंत असायच्या. पुढे आशिया खंडातील सर्वात मोठा नदी जोड प्रकल्प (भीमा सीना जोड कालवा) आमदार बबन दादा शिंदे यांनी पुढाकार घेऊन पूर्णत्वास आणला. सीना बारमाही जिवंत झाली,आणि परिस्थिती बदलली सिनेकाठी साखर कारखानदारी ची खरी सुरवात झाली.त्यानंतर माण नदीलाही कालव्याद्वारे पाणी सोडून थोडंफार जीवदान दिल. २००४ च्या दुष्काळात लोक गांगरून गेलेली पण २००५-०६ नंतर एकदम जोमात शेती पिकउ लागली. साखर कारखाने तर इतके झाले कि २०१० नंतर सलग दोनदा सोलापूर जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वात जास्त साखर निर्मिती करणारा जिल्हा ठरला (कारण सोलापूर-पुणे एकत्र पुणे विभाग पकडून सगळ्यात जास्त साखर उत्पादन झाले). उत्पादन वाढीची कारणे अशी कि, हमखास पीक, कारखान्याची उपलब्धता, भाव वाढ, शेत करी चळवळीची निर्मिती).
तस पाहता सगळ्या नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे साधारण दर १० -१२ किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे नद्याजोड माध्यमातून नद्यांना जिवंत करण्यास सरकार कुठेतरी यशस्वी झाले होते. यात साखर कारखानदार आपापल्या भागात पाणी सोडण्यासाठी अतोनात प्रयत्न करून लोकाना एक आशा दाखवू लागले. निवडणूक मध्ये निवडून येऊ लागले. खर कोड कोणालाच कळल नाही ती म्हणजे आपत्ती नियोजनाची, कारण प्रत्येकाने आपापल्या स्वार्थापोटी लोकांना पाणी वापरण्याची सवय लावली पण उपाय सांगितले नाहीत. स्वाभाविक आहे त्यांनी तितके केलं त्यातच भाग्य मानून आम्ही शेतकऱ्यांनी पण काही शहाणपण आणायला पाहिजे होत. पाणी बचत, ठिबक सिंचन काहीतरी करायला हवे होते. भीमाकाठ दुष्काळातही थोडा जास्त कट काढायचा कारण नदीचं पात्र मोठं अन पंढरीचा पांढुरंग, अन सोलापूर शहर त्यांचा एकमेव आधार होते. त्या दोन कारणासाठी भीमेला उजनीच्या मृत पाणी साठ्यातून पण पाणी सोडलं जायचं. पण सीना काठ पार धुराळून जायचा.( अजूनही तीच परिस्थिती आहे). मामाचा गाव अजूनही २०१४-१५ च्या दुष्काळात हिरवा आहे अन आम्ही शेत नुसती काळी करून उजनी भरण्याची वाट बघत आहोत.
शिक्षणाच्या माध्यमातून गावातून बाहेर पडलो असलो तरी गावाकडची अशी ओढ कायम आहे. आजही फरक शोधतोय तो इथल्या पुण्यातल्या जीवन पद्धतीचा आणि आपल्या गावाकडच्या जीवन पद्धतीचा. आजही उत्तर शोधतोय गावाकडच्या प्रगतीची. कधी कधी सापडतात कारणे केलेल्या चुकांची आणि थोडीशी अवघड पण शक्य असलेल्या उत्तरांची.
त्यापैकी एक आम्ही केलेली चूक सांगतोय आणि एक शक्य असलेले उत्तर ...

आम्ही
२००५ पासून ऊस पाणी वापरून ऊस शेती करतोय हि चूक नाही तर जास्त पाणी
वापरून नियोजन शून्य शेती करतोय हि चूक आहे (बऱ्याचदा आमच्या शेतकरी
भावाबरोबर यावर बोललोय). ठिबक अन इतर पिकांची पण शेती आपण करू शकतो याचा
अभ्यास आम्ही कधी केला नाही हि चूक पण असू शकते. ठिबक का अयशस्वी होत याच
कारण आम्ही कधी जास्त विचार करून शोधलं नाही. ( एक कारण सांगतो - नदी च्या
पाण्यावर ठिबक जास्त यशस्वी होत नाही कारण फिल्टर चॉक होतो. बंद पडतो )
यासाठी आणखी एक उत्तर आहे जे केले तर नक्की आमची स्वप्न पूर्ती होऊ शकते.
बहुतेक नदीकाठचा भाग काळ्या मातीचा आहे. ज्यात शेत तळे खूप कमी खर्चात होऊ शकते. तिथं जर मध्यम आकाराचा (अंदाजे ५० लाख लिटर किमान- ५ गुंठे जमिनीत-४० फूट खोल )- प्रति ३-४ एकर साठी) च शेत तळे केले तर ठिबक बऱ्याच प्रमाणात यशस्वी होईल आणि नदीवर पाणी वापर बरोबर पावसाळ्यात नदी पात्र बाहेर साठा मुबलक प्रमाणात होईल जो ३-४ एकर जमिनीला २ महिने आरामात पुरून उरेल. पीक पद्धतीत बदल हि खूप महत्वाचा विषय आहे, तसे केले तर परिस्थिती मात्र नक्की बदलेल याची मला खात्री आहे जर दर ३-४ एकर शेतीसाठी एक ५ गुंठे जमिनीत शेत तळे केलं तर .. फक्त नदी काठ शेत तळी लवकरात लवकर झाली तर फायदा जास्त दिसेल ...
अजूनही वेळ गेलेली नाही, भीमाकाठ असो व सिनाकाठ वा इतर जिल्ह्यातल्या, इतर राज्यातल्या प्रत्येक सधन शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीशिवाय हे करायला पाहिजे. जेणेकरून शासकीय मदत गरजुना मिळेल.
शेवटी एवढंच सांगायचंय कि नदी जोड प्रकल्प होऊन लगेच सुकाळ नाही येणार आपल्या सगळ्यांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार (विशेषतः माज्यासारख्या नदी काठच्या लोकांना ) कारण नदी काठ सोडला तर इतर सर्व ठिकाणी पाणी बचतीसाठी प्रयत्न होताना जास्त दिसत आहेत. त्यामुळे त्यांना बोल लावण्यात अर्थ नाही ..

त्यामुळे
भावांनो जरा ऐका .. शेत तळी नदी काठी करा ... कारण आतापर्यंत अशी कल्पना
कोणी लावली नाही. सगळे विचार करतात मोठे बंधारे बांधावे, पण ते करताना शेत
तळे केले तर आणखी फायदा आपलाच आहे ..
तुमचा हित चिंतक.
कृषी पुत्र,
शाम देशमुख