Tuesday, 15 July 2025

From Sugarcane to Sweet Success: Our Journey into Table Grape Farming

 

🍇 From Sugarcane to Sweet Success: Our Journey into Table Grape Farming

Farming is more than a profession — it's a way of life. For our family, this journey took a meaningful turn seven years ago when we transitioned from traditional sugarcane cultivation to table grape farming. Spread across 3 acres, our grape vineyard has now completed six fruitful cycles, and each year has taught us something new — both in the vineyard and in life.

🚜 Why We Switched from Sugarcane to Grapes

Our family farm was once filled with sugarcane — a reliable crop but one that demanded huge quantities of water. As the years passed, water scarcity became a concern. After much thought and discussion, we took a bold step into table grape farming, and it turned out to be one of the best decisions we’ve made.

Grapes, compared to sugarcane, are much more water-efficient, and the market demand for high-quality table grapes continues to grow both domestically and internationally. But more than just a business decision, grape farming became a new livelihood path for my younger brother — empowering him to become a skilled and independent farmer.

🌱 What Makes Table Grape Farming Special?

One of the most satisfying aspects of grape farming is seeing the fruitful rewards after months of careful pruning, monitoring, and nurturing the vines. With proper planning and care, grapevines can produce a high yield per plant, translating into a strong source of income for small and medium-sized farms.

However, grape farming is not easy — especially when it comes to the technical part of managing the vines.

🧑‍🌾 The Real Challenge: Skilled Labour

One of the most critical — and often overlooked — challenges in table grape farming is the need for skilled labour. Tasks like:

  • Pruning the vines

  • Cutting the shoots at the right stage

  • Creating grape stumps (where fruit bunches eventually grow)

These are not just routine jobs — they require experience, timing, and precision. A small mistake in pruning or training the vine can drastically reduce the fruit yield — turning a season of potential profit into a painful loss.

We've learned this lesson firsthand. When skilled hands are at work, the yield per plant improves significantly, leading to better quality grapes and higher market prices. But if labourers are not trained or make errors in pruning, the entire crop's performance suffers.

📚 Our Takeaway: Skill is as Valuable as Soil

Over the last six years, we've realized that agriculture is as much about people as it is about plants. Investing in training and retaining skilled workers has become just as important as irrigation or fertilizers.

💡 Final Thoughts

For us, grape farming has been more than just an income stream — it's been a transformation. From water-intensive sugarcane fields to a high-value vineyard, we've witnessed how thoughtful choices, technical understanding, and skilled hands can change the future of a family farm.

If you're a farmer or planning to step into agriculture, grapes might just be your next big opportunity — as long as you respect the science, the timing, and most importantly, the skill involved in every vine you touch.


Would you like a version with images, a LinkedIn post, or even a short video script based on this blog?

Friday, 18 January 2019

1 problem

मी पश्चिम महाराष्ट्रातील त्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस शेतीवर निगडित एक महत्वाचा प्रॉब्लेम वर बोलणार आहे. परवाच ऊस दराचा प्रश्न अतिशय योग्य म्हणता नाही येणार पण नीट सोडवला.  साहेब बाजारात असलेल्या साखरेच्या भाव आणि उसाचे उत्पादन यावर ऊस दर ठरतो. मग मला काही प्रश्न पडलेत . 
१. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे मुल्याकंन जास्त असूनही एफ आर पी २३० रुपये ९.५ साखर उतारऱ्याला कशी काय? २३० मध्ये १० रुपये तरी वाढ अपेक्षित नव्हती का? कारण सगळ्याच निगडित गोष्टीचे दर वाढलेलं आहेत (खतापासून ते मजुरापर्यंत )
२. १७५ रुपये जास्त देण्याचं ठरल ते त्यामुळेच आहे का? असेल तर हे आधीच का नाही केलं? राजू शेट्टींना आंदोलनाची आशा दाखवण्याची वेळ आली नसती.
मी चुकीचं बोलतोय असं वाटलं तर माफ करा पण तो सर्वांच्या मनातील प्रश्न आहे. 
साहेब, महाराष्ट्रात एखादा उद्योग यावा यासाठी आपल्याला परदेश दौरे करावे लागतात. मग मॅनुफॅक्टअरिंग  किंवा माहिती तंत्रज्ञान सारखी एखादी कंपनी येते त्यांनाही खूप करसवलती द्याव्या लागतात. याही कंपन्या आर्थिक मंदीच्या काळात जास्त रोजगार निर्मिती देऊ नाही शकत. त्या तुलनेत आपला ऊस उद्योग ऑलरेडी सेट झालेला आहे.रोजगारही खूप मोठ्या स्केल वर तयार होतो. तुम्हाला त्याचा अंदाज नक्की असेल.  स्कील डेव्हलपमेंट ची गरज खूप कमी आहे. बाजार पेठ थोडी अस्थिर असली तरी उपाय आपल्याकडे अनुभवाच्या जोरावर शोधता येतात. साखर उद्योग वाढावा अशी आपली योजना असतील हि पण मूळ खोडा वेगळाच आहे तो म्हणजे निसर्ग आणि पाणी, एक वर्ष पाऊस नाही झाला तर शास्त्रीय डोकं चालवणारी माणसं ऊस शेतकऱ्याला आरोप्याच्या पिंजऱ्यात उभा करून फजिती  करायला सुरुवात करतात. डाळिंब केलं तेल्या रोगानं नेलं, द्राक्षे केले आभाळ फाटलं, गारपीठ झाली (सगळं संपत). कांदा केला दर पडलेले असतात. ऊस सोडलं तर असं कोणताच पीक नाही त्याला हमीभाव आहे. म्हणून एकदा का धरणे भरली कि ऊस क्षेत्र वाढत. म्हणून शेतकरी ऊस करतो. नशिबाने कारखाने खूप आहेत. उसाला गाळपाचे अडचण आता होत नाही. पण ...
ठिबक च यश कमी आहे. सर्वजण च काय मीही ठिबक करू शकत नाही. अडचणी कर्जापासून ते पारंपरिक पद्धतीवर आवलंबून आहेत. मी अजिबात म्हणत नाही कि ठिबक यशस्वी होत नाही. नक्कीच यशस्वी होईल त्यासाठी आपणास खालील प्रयोगचा विचार नक्की करावा अशी माझी विनंती आहे.

१.साहेब खरंच सर्वच शेतकऱ्याना आधीच कर्ज खूप बोजा आहे (ते आपल्याला सर्वेच सांगेल)
    नवीन कर्ज तेही ११ टक्के व्याज दराने आणि दीर्घ मुदतीत खरच अशास्वत शेतीला परवडणार  नाही. आणि सरकारी अनुदान शाश्वत असेल  तर ते नक्की घ्यायला काहीच वाटलं नसत. आणि अनुदान पद्धतीवर ठिबक करताना असाही ४० % पण रक्कम खिशातच नाहीतर कुठून आणणार. अनुदान मिळण्यासाठी वाट बघावी लागते. आणि सरकारलाही अनुदान रक्कम व्याजात भरणे शक्य आहे. म्हणजे आशा योजनांचा आपल्या तिजोरीवर जास्त बोजा पडणार नाही असं मला वाटते. 
२. त्यासाठी जर आपण वेगळी योजना केली तर नक्की परवडेल( उसाला ठिबक सिंचन) साठी वेगळे आणि ज्यांनी खरोखर साखर कारखान्याला नोंद दिली आहे, अश्या शेतकऱ्याला ऊस क्षेत्र मोजून बिन व्याजी ३ -५ वर्ष मुदतीचा उसने पैशे कर्ज स्वरूपात सरकारने ठिबक सिंचन सेट घेतलेल्या दुकानदाराच्या नावावर चेक देऊन द्यावे ( आणि ज्याची वसुली इत्तर कर्जाच्या तुलनेत प्राधान्याने करावी. जेणेकरून ते थकीत राहणार नाही. (५० टक्के आनुदानापेक्षा नक्कीच परवडेल).असा ११ टक्के व्याजदर परवडणारा नाही. 
३. यामध्ये छोटा शेत तळे (एकरी ३ लाख लिटर क्षमतेचे ( अंदाजे  ४० बाय ३० बाय १० फूट ) जे संकट काळी अंदाजे १० दिवस एक एकराला राखीव पाणी पुरवेल आणि खणणे  व कागद सहित खर्चही त्याच उसन्या पैशातून होईल अशी योजना बनवावि ), 
शेत तळे प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्र नुसार वेगळे असेल फक्त एक अनुमान वरती मांडलं आहे. 

४.  असे केले सरकारला एकरी ४० ते ५० हजार रूपये कर्ज स्वरूपात शेतकऱ्याला द्यावे लागेल. (तेवढे कर्ज आता पीक कर्ज म्हणून मिळत पण ते त्या पिकाच्या संवर्धना साठी गरजेचे आहे ) आणि ठिबक सिंचनाच्या कर्ज च्या त्या रकमेचे व्याज फक्त सरकारला भरावे लागेल. तर ५०-७० टक्के ऊस क्षेत्र फक्त व्याज स्वरूपात सरकारकडून ठिबक खाली आणण्याचा प्रयत्न नक्की यशस्वी होईल  असं मला विश्वास आहे.
५. इतर राज्यात उसाला ठिबक साठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न दिसून येत आहेत त्या मानाने आपल्यात कमीच प्रयत्न आहेत. अशी जर एकादी योजना पहिल्यापासून आस्तित्वात असेल नक्की सांगावी जेणेकरून आम्हीही प्रत्येक शेतकर्या पर्यंत पोहचवण्यासाठी नक्की मदत करू. मदतच काय, पण आमच्या मित्रांची एक फौज बनवून स्वयंसेवक म्हणून काम करायलाही तयार आहे. तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते ...
फक्त साहेब ऑलरेडी सेट असलेल्या उद्योगावर कृपया दुर्लक्ष करू नका.आणि आपण करणार नाही  असा विश्वास आहे या  वर्षी पाण्याचं काटेकोर वापर व्हावा असे आपणास वाटत असेल तर आपणास माझ्या सुचवलेल्या अथवा त्याही पेक्षा चांगल्या योजनेचा विचार नक्की करावा लागेल हि विनंती. 
असा नाही कि वरील योजनेत सर्व शेतकरी तयार होतीलच कारण कोणाला अनुदान हवे असते तर कोणाला व्याजदर कमी ते हि एश्चिक करावे. त्याचाही विचार आपण करावा. एकंदरीत योजना या आम्हाला परवडणाऱ्या आहेत पण लाभ शक्य होण्यासाठी काही पर्याय उपलब्ध करावे हि विनंती ..
मी तुम्हाला डायरेक्ट हा संदेश लिहिला कारण विषय अतिमहत्त्वाचा वाटतो, आता यावर उशीर व्हायला नको  असं मला वाटले.
 

बाकी आपण चांगले काम करत आहेत, असेच करत राहावे.. जनतेच्या आशा पूर्ण कराव्या .
आपल्या पुढील कार्यासाठी तमाम शेतकर्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा !!

रानवारा

रानवारा
मी शेतात नाही चाललो अस  खोट खोट  बापू नि म्हणायचं …तरीही खूप रडायचं  मळइला (नदीच्या काठावरच्या शेताच नाव) जाण्याचा हट्ट करायचा मग आम्ही दोघा लहान  भावा नि पायात चपला न घालताच  त्यांच्या मागे पाळायचं . त्यावेळी  मळइला जाण्याच कारण फक्त एकच होत कि गेल कि मनसोक्त भटकायचं .ऊस ,बोर , गाजरे ,शेंदाडी ,रताळी ,लाल लाल टोमाटो ,जांभूळ ,उंबरे ,मध काही न काहीतरी मिळायचं  आणि  त्यापेक्षा अधिक आनंद देणारी गवताच्या बांधावरची घसरगुंडी .ते दिवस कधी संपले आणि  आयुष्य कधी बदलले हे कळलाच नाही .लहान होतो तेव्हाच एक साधारण २ फुटाची वाळलेल्या लाकडाची काठी हातात दिलेली आणि फक्त ४ शब्दाची  हाक ( चालू कर आणि  बंद कर) ला लाल आणि हिरवा बटन दाबून मोटार कशी चालू  बंद करायची हे शिकवलेलं . त्यानंतर पाटाच पाणी धरताना कपडे चीक्लात भरवून पाणी खेळायचं मज्जा काही औरच । शेतकर्याची लेकरे सर्वसाधारण अशी काम लहानपणापासूनच करतात आणि आज हि कधी कधी तो प्रसंग आल्यावर लहानपण आठवते .
मी शाळे मध्ये  बरा होतो  त्यामुळे घरच्यांनी  मी खूप  शिकावं  अशी अपेक्षा वेळोवेळी व्यक्त केली आणि तसा धडाही दिला आणि त्या मूळेच मी आजवर मजल मारली . सध्या मी PCCOE  येथे ME ला आहे .पण  Engieering chya पहिल्या दिवशी मलाही घर सोडवत नव्हते ना आजवर कधी हि १५ दिवसाहून  जास्त दिवस घर सोडून राहू वाटले नाही . लहान बंधुराजाने मात्र ते अगदी सहज शिक्षणाच्या विऴख्यातून स्वतःला सोडून घेतले आणि रानवारा आपला केला . 
बाहेरच्या जगात अजूनही खूप अज्ञात आहे पण शेतातल्या मात्र पालापाचोल्यापासून सर्व  झाडाच्या पिकाच्या , गवताच्या ,पाखरांच्या ओळखी आहेत. तिथे नाहि  अमावसेच्या काळ्याकुट्ट अंधाराची भीती  . पण इथे अजूनही दिवसा भीती  वाटते बॉम्ब स्फोट,चोरी,करणाराची  आणि रस्त्यावर एकाद्याला मदत करण्याची .  मला तर शेजारच्या flat मध्ये कोण राहते हे अजूनही माहित नाही ,माणुसकी तर इथ  आल्यापासुन कधी अन कधीच आजवर पाहिली नाही . खरच मी कुठल्यातरी विचित्र दुनियेत जगत असल्याची चूक तर नाही न करत अस वाटते बर्याचदा पण पुन्हा पुन्हा त्याचा विचार केल्यावर आपल्याला दिलेल्या जबाबदारीची आठवण होते आणि स्वताला सावरतो . आणि या जगात काही चांगलीही माणसे भेटलीत पण आवर्जून सांगाव वाटते कि ते हि माझासारख रानवारा सोडून इकडे आलेत.अगदी थोडक्यात सांगायचं झाल तर त्यांना माझ्यासोबत असलेला रानवाऱ्या चा गंध येतोय आणि म्हणूनच त्यांनी मला आपलस करून घेतलेय , त्याच तर आधारवर मी या जगात जगतोय ,,
आजही मी घरी जाण्याच्या आधी माझे पाय राना कडे आपोआप वळतात .माझ आणि त्याच नात इतक घट्ट  झालय कि मी ते शब्दात मांडूच नाही शकत आज  जरी माझ्याकडे तीच मळ इ नसली तरी माझ्या  नवीन शेताचा गंध तोच आहे ,, ऊस ,गाजर ,जांभूळ,बोर  काहीना काही मिळते .पण खर  सांगू त्यापेक्षा खूप आनंद होतो तो म्हणजे हिरव्या गार पिकाकडे पाहून ,,, शेताच्या चारही कोपरयावर फिरून … कारण या रक्तामध्ये एक रानवारा भिनलाय ,,,मिसळलाय ,,, भिडला आहे काहीही म्हणा  मला फक्त आणि फक्त आठवतो तो रानवारा ती माती  आणि ती माणसे … आभिमान आहे माझे बापू शेतकरी आहेत  आणि मी शेतकऱ्याचा असल्याचा …………………………  जय किसान 

Saturday, 30 July 2016

नदी काठच्या शेतकरी भावांनो थोडं ऐकता का ????

लहान पणी जेव्हा केव्हा मामाच्या गावी जात असे तेव्हा नेहमी आपला गाव आणि मामाचा गाव यामध्ये सारखं अन वेगळं काय हे शोधायचो. पण जास्त फरक नव्हताच कारण दोन्ही गावे तशी खेडीच.फरक असायचा तो मामाचा गाव म्हणजे भीमा काठ उसाचा अथांग पसरलेला हिरवळ शिवार आणि आमचा गाव म्हणजे सीना काठ, खरीप, रब्बी चा आमचा अथांग सहामाही हिरवा शिवार त्यामध्ये कुठेतरी (२-३) एकराचा उसाचा तुकडा (जो फक्त खरीप अन रब्बी हंगामात हिरवा अन उन्ह्याळ्यात पाण्यावाचून जळालेला असायचा). सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके,त्यापैकी माळशिरस, उत्तर सोलापूर (एकही नदी नाही), करमाळा अन माढा तालुक्याला (सीना ,भीमा), पंढरपूर अन मंगळवेढा ला (माण ,भीमा), दक्षिण सोलापूर (भीमा)  बार्शी (भोगावती), मोहोळ (सीना ,भीमा ) क्कलकोट (कुरनूर नदी  पण खूप छोटी ) अश्या प्रकारे नद्यांचा लाभ होतो. भीमाकाठ अन सिनाकाठ हा भाग सोडून आणखी दोन नद्या आमच्या जिल्ह्यात त्या म्हणजे माण ( जी दुष्काळी माण देशातून सांगोला,मंगळवेढा न पंढरपूर तालुक्यात भीमेला मामाच्या गावी मिळते) अन दुसरी भोगावती ( जी मराठवाड्यातून बार्शी अन शेवटी मोहोळ तालुक्यात येऊन आमच्या गावी सीना नदीला मिळते). हा भूगोल एवढ्यासाठीच सांगतोय कारण प्रगतीची खरी गुपित आपल्या भूगोलातच कशी दडलीत ती फक्त या ब्लॉग च्या माध्यमातून एक उदाहरण म्हणून सांगायचा एक प्रयत्न करतोय.
भीमा नदीवर यशवंतराव चव्हाणांनी साधारण ३० वर्षांपूर्वी उजनी धरण बांधले. त्यामुळे दुष्काळी सोलापूरचे चित्र बदलले आणि किमान भीमाकाठ आणि अक्कलकोट, बार्शी वगळता इतर सर्व तालुके (खरीप आणि रब्बी हंगाम चांगल्या पद्धतीने घेऊ लागले). भीमाकाठ मात्र साखर कारखानदारीत चांगलाच नटू लागला.सीना, माण अन भोगावती नद्या मात्र सहामाहीच जिवंत असायच्या. पुढे आशिया खंडातील सर्वात मोठा नदी जोड प्रकल्प (भीमा सीना जोड कालवा) आमदार बबन दादा शिंदे यांनी पुढाकार घेऊन पूर्णत्वास आणला. सीना बारमाही जिवंत झाली,आणि परिस्थिती बदलली सिनेकाठी साखर कारखानदारी ची खरी सुरवात झाली.त्यानंतर माण नदीलाही कालव्याद्वारे पाणी सोडून थोडंफार जीवदान दिल. २००४ च्या दुष्काळात लोक गांगरून गेलेली पण २००५-०६ नंतर एकदम जोमात शेती पिकउ लागली. साखर कारखाने तर इतके झाले कि २०१० नंतर सलग दोनदा सोलापूर जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वात जास्त साखर निर्मिती करणारा जिल्हा ठरला (कारण सोलापूर-पुणे एकत्र पुणे विभाग पकडून सगळ्यात जास्त साखर उत्पादन झाले). उत्पादन वाढीची कारणे अशी कि, हमखास पीक, कारखान्याची उपलब्धता, भाव वाढ, शेत करी चळवळीची निर्मिती).
तस पाहता सगळ्या नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे साधारण दर १० -१२ किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे नद्याजोड माध्यमातून नद्यांना जिवंत करण्यास सरकार कुठेतरी यशस्वी झाले होते. यात साखर कारखानदार आपापल्या भागात पाणी सोडण्यासाठी अतोनात प्रयत्न करून लोकाना एक आशा दाखवू लागले. निवडणूक मध्ये निवडून येऊ लागले. खर कोड कोणालाच कळल नाही ती म्हणजे आपत्ती नियोजनाची, कारण प्रत्येकाने आपापल्या स्वार्थापोटी लोकांना पाणी वापरण्याची सवय लावली पण उपाय सांगितले नाहीत. स्वाभाविक आहे त्यांनी तितके केलं त्यातच भाग्य मानून आम्ही शेतकऱ्यांनी पण काही शहाणपण आणायला पाहिजे होत. पाणी बचत, ठिबक सिंचन काहीतरी करायला हवे होते. भीमाकाठ दुष्काळातही थोडा जास्त कट काढायचा कारण नदीचं पात्र मोठं अन पंढरीचा पांढुरंग, अन सोलापूर शहर त्यांचा एकमेव आधार होते. त्या दोन कारणासाठी भीमेला उजनीच्या मृत पाणी साठ्यातून पण पाणी सोडलं जायचं. पण सीना काठ पार धुराळून जायचा.( अजूनही तीच परिस्थिती आहे). मामाचा गाव अजूनही २०१४-१५ च्या दुष्काळात हिरवा आहे अन आम्ही शेत नुसती काळी करून उजनी भरण्याची वाट बघत आहोत.
शिक्षणाच्या माध्यमातून गावातून बाहेर पडलो असलो तरी गावाकडची अशी ओढ कायम आहे. आजही फरक शोधतोय तो इथल्या पुण्यातल्या जीवन पद्धतीचा आणि आपल्या गावाकडच्या जीवन पद्धतीचा. आजही उत्तर शोधतोय गावाकडच्या प्रगतीची. कधी कधी सापडतात कारणे  केलेल्या चुकांची आणि थोडीशी अवघड पण शक्य असलेल्या उत्तरांची.
त्यापैकी एक आम्ही केलेली चूक सांगतोय आणि एक शक्य असलेले उत्तर ...
आम्ही २००५ पासून ऊस पाणी वापरून ऊस शेती करतोय हि चूक नाही तर जास्त पाणी वापरून नियोजन शून्य शेती करतोय हि चूक आहे (बऱ्याचदा आमच्या शेतकरी भावाबरोबर यावर बोललोय). ठिबक अन इतर पिकांची पण शेती आपण करू शकतो याचा अभ्यास आम्ही कधी केला नाही हि चूक पण असू शकते. ठिबक का अयशस्वी होत याच कारण आम्ही कधी जास्त विचार करून शोधलं नाही. ( एक कारण सांगतो - नदी च्या पाण्यावर ठिबक जास्त यशस्वी होत नाही कारण फिल्टर चॉक होतो. बंद पडतो )
यासाठी आणखी एक उत्तर आहे जे केले तर नक्की आमची स्वप्न पूर्ती होऊ शकते.
बहुतेक नदीकाठचा भाग काळ्या मातीचा आहे. ज्यात शेत तळे खूप कमी खर्चात होऊ शकते. तिथं जर मध्यम आकाराचा (अंदाजे ५० लाख लिटर किमान- ५ गुंठे जमिनीत-४० फूट खोल )- प्रति ३-४ एकर साठी) च शेत तळे केले तर ठिबक बऱ्याच प्रमाणात यशस्वी होईल आणि नदीवर पाणी वापर बरोबर पावसाळ्यात नदी पात्र बाहेर साठा मुबलक प्रमाणात होईल जो ३-४ एकर जमिनीला २ महिने आरामात पुरून उरेल. पीक पद्धतीत बदल हि खूप महत्वाचा विषय आहे, तसे केले तर परिस्थिती मात्र नक्की बदलेल याची मला खात्री आहे जर दर ३-४ एकर शेतीसाठी एक ५ गुंठे जमिनीत शेत तळे केलं तर .. फक्त नदी काठ शेत तळी लवकरात लवकर झाली तर फायदा जास्त दिसेल ...
अजूनही वेळ गेलेली नाही, भीमाकाठ असो व सिनाकाठ वा इतर जिल्ह्यातल्या, इतर राज्यातल्या प्रत्येक सधन शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीशिवाय हे करायला पाहिजे. जेणेकरून शासकीय मदत गरजुना मिळेल.
शेवटी एवढंच सांगायचंय कि नदी जोड प्रकल्प होऊन लगेच सुकाळ नाही येणार आपल्या सगळ्यांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार (विशेषतः माज्यासारख्या नदी काठच्या लोकांना ) कारण नदी काठ सोडला तर इतर सर्व ठिकाणी पाणी बचतीसाठी प्रयत्न होताना जास्त दिसत आहेत. त्यामुळे त्यांना बोल लावण्यात अर्थ नाही ..
त्यामुळे भावांनो जरा ऐका .. शेत तळी नदी काठी करा ... कारण आतापर्यंत अशी कल्पना कोणी लावली नाही. सगळे विचार करतात मोठे बंधारे बांधावे, पण ते करताना शेत तळे केले तर आणखी फायदा आपलाच आहे ..
तुमचा हित चिंतक.
कृषी पुत्र,
          शाम  देशमुख