रानवारा
मी शेतात नाही चाललो अस खोट खोट बापू नि म्हणायचं …तरीही खूप रडायचं मळइला (नदीच्या काठावरच्या शेताच नाव) जाण्याचा हट्ट करायचा मग आम्ही दोघा लहान भावा नि पायात चपला न घालताच त्यांच्या मागे पाळायचं . त्यावेळी मळइला जाण्याच कारण फक्त एकच होत कि गेल कि मनसोक्त भटकायचं .ऊस ,बोर , गाजरे ,शेंदाडी ,रताळी ,लाल लाल टोमाटो ,जांभूळ ,उंबरे ,मध काही न काहीतरी मिळायचं आणि त्यापेक्षा अधिक आनंद देणारी गवताच्या बांधावरची घसरगुंडी .ते दिवस कधी संपले आणि आयुष्य कधी बदलले हे कळलाच नाही .लहान होतो तेव्हाच एक साधारण २ फुटाची वाळलेल्या लाकडाची काठी हातात दिलेली आणि फक्त ४ शब्दाची हाक ( चालू कर आणि बंद कर) ला लाल आणि हिरवा बटन दाबून मोटार कशी चालू बंद करायची हे शिकवलेलं . त्यानंतर पाटाच पाणी धरताना कपडे चीक्लात भरवून पाणी खेळायचं मज्जा काही औरच । शेतकर्याची लेकरे सर्वसाधारण अशी काम लहानपणापासूनच करतात आणि आज हि कधी कधी तो प्रसंग आल्यावर लहानपण आठवते .
मी शाळे मध्ये बरा होतो त्यामुळे घरच्यांनी मी खूप शिकावं अशी अपेक्षा वेळोवेळी व्यक्त केली आणि तसा धडाही दिला आणि त्या मूळेच मी आजवर मजल मारली . सध्या मी PCCOE येथे ME ला आहे .पण Engieering chya पहिल्या दिवशी मलाही घर सोडवत नव्हते ना आजवर कधी हि १५ दिवसाहून जास्त दिवस घर सोडून राहू वाटले नाही . लहान बंधुराजाने मात्र ते अगदी सहज शिक्षणाच्या विऴख्यातून स्वतःला सोडून घेतले आणि रानवारा आपला केला .
बाहेरच्या जगात अजूनही खूप अज्ञात आहे पण शेतातल्या मात्र पालापाचोल्यापासून सर्व झाडाच्या पिकाच्या , गवताच्या ,पाखरांच्या ओळखी आहेत. तिथे नाहि अमावसेच्या काळ्याकुट्ट अंधाराची भीती . पण इथे अजूनही दिवसा भीती वाटते बॉम्ब स्फोट,चोरी,करणाराची आणि रस्त्यावर एकाद्याला मदत करण्याची . मला तर शेजारच्या flat मध्ये कोण राहते हे अजूनही माहित नाही ,माणुसकी तर इथ आल्यापासुन कधी अन कधीच आजवर पाहिली नाही . खरच मी कुठल्यातरी विचित्र दुनियेत जगत असल्याची चूक तर नाही न करत अस वाटते बर्याचदा पण पुन्हा पुन्हा त्याचा विचार केल्यावर आपल्याला दिलेल्या जबाबदारीची आठवण होते आणि स्वताला सावरतो . आणि या जगात काही चांगलीही माणसे भेटलीत पण आवर्जून सांगाव वाटते कि ते हि माझासारख रानवारा सोडून इकडे आलेत.अगदी थोडक्यात सांगायचं झाल तर त्यांना माझ्यासोबत असलेला रानवाऱ्या चा गंध येतोय आणि म्हणूनच त्यांनी मला आपलस करून घेतलेय , त्याच तर आधारवर मी या जगात जगतोय ,,
No comments:
Post a Comment